टी.एस.दिघोळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव ता.सिन्नर जि.नाशिक
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित टी.एस.दिघोळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव ता.सिन्नर जि.नाशिक या विद्यालयात इ.८ वी ते इ.११ वी व १२ वी (कला,विज्ञान,वाणिज्य) चे वर्ग आहेत. सदर विद्यालयात निसर्गरम्य वातावरणात विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत भौतिक सुविधांयुक्त दर्जेदार अध्यापन केले जाते. यामध्ये वातानुकुलीत आर.सी.सी.बांधकाम असलेली प्रशस्त इमारत, विद्यार्थ्यांच्या देखरेखीकरिता २४ तास CCTV कॅमेऱ्यांची उपलब्धता, मजबूत संरक्षण भिंत, विद्यार्थ्यांकरिता RO फिल्टर पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध आहे. याबरोबरच विद्यार्थी अध्यापनाकरिता प्रशिक्षित असलेला प्राध्यापक वृंद, आधुनिक शिक्षणाकरिता प्रोजेक्टर, संगणक कक्ष, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सशक्त करण्याकरिता विविध खेळाचे साहित्य विद्यालयात उपलब्ध आहे. नायगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांकरिता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्र (इ.१२ वी परीक्षा केंद्र) कार्यान्वित आहे. विद्यालयात नायगाव पंचक्रोशीतील १००० विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यालयातून शिकून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी सैन्यदल, सरकारी नोकरदार तसेच अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत. टी.एस.दिघोळे विद्यालयाने उज्वल शिक्षणाची परंपरा कायम टिकविण्याबरोबरच परिसरातील एक नामांकित शैक्षणिक संकुल म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे.

OUR GALLERY







Contact Us

Address
नायगाव ता.सिन्नर जि.नाशिक पिन ४२२१०२

Call Us
९८८१६२३२७

Email Us
tsdigholesecondaryvidyalaya99@gmail.com